शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

अमळनेर येथे आचारसहींता भंग केल्याचे तीन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 6:37 PM

लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार कलम १२७ अ व भादवी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल

अमळनेर : शहरात २०० मीटरच्या आत भाजपाचा बूथ लावल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केल्याने आचारसंहिता भंगाचे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आचार संहिता प्रमुख अजय नष्टे, तहसीलदार ज्योती देवरे तसेच आर. एन. पाटील , के. टी. पाटील यांनी मतदान केंद्रांवर भेट दिली असता पंचायत समिती केंद्र १६६ वर मोहित विजय सोनवणे व मुकेश रमेश पारधी दोन्ही रा. स्टेशनरोड यांनी पंचायत समितीच्या आवारात १६६ क्रमांकाचा बूथ लाऊन ते मतदारांना चिठ्ठी वाटप करताना आढळून आले. त्यामुळे आचारसंहिता भंग केला. याबाबत अजय नष्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार कलम १२७ अ व भादवी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इंदिरा गांधी शाळेजवळ बूथ क्रमांक १८३ जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे नाव व फोटो असलेल्या चिठ्ठया बुथवर आढळून आल्याने चेतन नामदेव मिस्तरी, निलेश धनराज भोई व सागर महेंद्र बडगुजर रा. हनुमाननगर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर पंचायत समिती जवळील बुथवर उमेश सतीश सोनार व पठाण काशीफखान इस्माईल दोही रा. जोशीपुरा यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव व चिन्ह असलेल्या चिठ्ठया मतदारांना वाटप केल्यामुळे त्यांच्यावरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.