बंधाऱ्यांवर पाट्या ठेवल्याबद्दल तिघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:24 IST2021-09-10T04:24:20+5:302021-09-10T04:24:20+5:30

तालुक्यातील धानोरा येथील कल्पना भीमराव पवार यांचा मुलगा समाधान हा बंधाऱ्यावरून जाण्यासाठी पाट्या ठेवत होता. यावेळी गावातील विश्वास भगा ...

Three beaten for placing boards on dams | बंधाऱ्यांवर पाट्या ठेवल्याबद्दल तिघांना मारहाण

बंधाऱ्यांवर पाट्या ठेवल्याबद्दल तिघांना मारहाण

तालुक्यातील धानोरा येथील कल्पना भीमराव पवार यांचा मुलगा समाधान हा बंधाऱ्यावरून जाण्यासाठी पाट्या ठेवत होता. यावेळी गावातील विश्वास भगा नाईक हा काय रिकामे काम करत आहे, असे म्हणत शिवीगाळ करू लागला. समाधान हा त्याच्या घराजवळ गेला असता त्यास विश्वास नाईक, अशोक नाईक, विनोद नाईक यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याची आई कल्पनाबाई या त्यांच्या दोन मुलींसह मुलाला का मारले, याचा जाब विचारायला गेल्या असता अशोक नाईक, ज्योतीलाल नाईक, अनिल नाईक, मीराबाई नाईक, सुशीलाबाई नाईक यांनी त्यांच्यासह दोन मुलींनाही चापटा, बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी कल्पनाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत भादंवि कलम १४३, १४७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.

Web Title: Three beaten for placing boards on dams