साडेतीन लाखांचे सागाचे लाकूड जप्त

By Admin | Updated: October 13, 2015 23:15 IST2015-10-13T23:15:33+5:302015-10-13T23:15:33+5:30

सागाच्या लाकडाची चोरटी वाहतूक करणारे वाहन वनविभागाच्या अधिका:यांनी पाठलाग करून ताब्यात घेतल़े या वाहनातून साडेतीन लाखांचे सागवानी लाकूड जप्त केल़े

Three and a half million seawater seized | साडेतीन लाखांचे सागाचे लाकूड जप्त

साडेतीन लाखांचे सागाचे लाकूड जप्त

धडगाव : तालुक्यातील दुर्गम भागात सागाच्या लाकडाची चोरटी वाहतूक करणारे वाहन वनविभागाच्या अधिका:यांनी पाठलाग करून ताब्यात घेतल़े या वाहनातून साडेतीन लाखांचे सागवानी लाकूड जप्त केल़े

तालुक्यातील खरवड फाटा ते मातखेडा या रस्त्यावरून अवैधरीतीने 50 सागाच्या दांडय़ा वाहून नेण्यात येत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती़ या माहितीनुसार शहादा वनविभागाचे उपवनसंरक्षक डी़डी़ साळविठ्ठल, उपवनसंरक्षक एल़बी़ चंदेल यांच्यासह वन कर्मचा:यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास खरवड फाटय़ावर पाळत ठेवली़ या वेळी पथकातील कर्मचा:यांना एमएच 43-एफ 1064 हे चारचाकी वाहन खरवड गावाकडे भरधाव वेगात येत असल्याचे दिसून आल़े पथकातील कर्मचा:यांनी पुढे जाऊन वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, वाहनचालकाने थेट वन कर्मचा:यांच्या अंगावर गाडी घातली़ संबंधित कर्मचा:यांनी रस्त्याच्या कडेला उडय़ा टाकल्याने त्यांचा जीव बचावला़ या वाहनाचा पाठलाग वन कर्मचा:यांनी सुरू केला़ काही अंतर पुढे गेल्यानंतर लाकूड वाहून नेणा:या वाहनचालकाने मातखेडा गावाजवळ वाहन सोडून देत पळ काढला़ वाहन मिळून आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचा:यांनी कारवाई करत सागाच्या 50 दांडय़ा व वाहन असा साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला़

चारचाकी वाहन सोडून पळ काढणा:या वाहनचालकाचा अधिका:यांकडून शोध घेण्यात येत आह़े या कारवाईत वनविभागाचे प्रवीण लामगे, एस़एस़ पदमोर, राठोड आदींनी सहभाग घेतला़

Web Title: Three and a half million seawater seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.