जळगाव : धमकी देणारे दररोज घरात काहीतरी फेकत असल्याने त्या प्रकाराला घाबरुन परेश नरेश रणदिवे (वय १८, रा.नवीन जोशी कॉलनी, जळगाव) या तरुणाने शेजारी काकाच्या घरात जाऊन गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली. परेश याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, परेश हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गेल्या काही दिवसापासून तो घरी असताना कोणी तरी घरात चिठ्ठया फेकून पळून जात आहेत. या चिठ्ठीत धमकीचा मजकूर आहे. नेमका काय मजकूर आहे, धमकी देणारे कोण? कशासाठी धमकी दिली जात आहे. नेमके कारण काय? की त्यामुळे परेश याला आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.परेश याने शेजारी राहणारे काका गणेश काशिनाथ जोशी यांच्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला मित्र व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परेश याची आई मजुरी करते. त्याला एक भाऊ व एक बहिण आहे. वडीलांचे निधन झाल्याने परेश हाच घरातील कर्ता पुरुष आहे.
धमक्यांना घाबरुन जळगावात तरुणाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:23 IST
धमकी देणारे दररोज घरात काहीतरी फेकत असल्याने त्या प्रकाराला घाबरुन परेश नरेश रणदिवे (वय १८, रा.नवीन जोशी कॉलनी, जळगाव) या तरुणाने शेजारी काकाच्या घरात जाऊन गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली.
धमक्यांना घाबरुन जळगावात तरुणाने घेतला गळफास
ठळक मुद्देनवीन जोशी कॉलनीतील घटनाघरात कोणीतरी चिठ्ठी फेकत असल्याचा आरोपकाकाच्या घरात जाऊन केला आत्महत्येचा प्रयत्न