पळवून नेण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीची घरात जाऊन काढली छेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 20:17 IST2017-11-04T20:13:52+5:302017-11-04T20:17:51+5:30
हरिविठ्ठल नगरात पळवून नेण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीची छेड काढणा-या सागर भोई (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) याला रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पळवून नेण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीची घरात जाऊन काढली छेड
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,४: हरिविठ्ठल नगरात अल्पवयीन मुलीची छेड काढून धमकी देणा-या सागर भोई (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) याला रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी २ नोव्हेंबर रोजी रोजी दुपारी ४ वाजता मैत्रिणीसोबत घरात बसलेली असताना सागर भोई हा घरात आला व हात धरून तुला पळवून नेईल असा बोलला. त्या मुलीने घराबाहेर बसलेल्या काकाला आवाज दिल्यानंतर सागर हा तेथून पळून गेला. काका आल्यानंतर मुलीने संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली.यानंतर दुस-या दिवशी सायंकाळी पुन्हा सागर हा त्या मुलीच्या घरासमोर येवून शिवीगाळ करू लागल्याने काका व आजोबांनी याचा जाब विचारला असता त्याने दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी शनिवारी सकाळी बालिकेने रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सागर भोई याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.