शाहू नगरातील घरातून 44 हजारांच्या ऐवजावर चोरटय़ांचा डल्ला

By Admin | Updated: May 26, 2017 15:29 IST2017-05-26T15:29:10+5:302017-05-26T15:29:10+5:30

शाहूनगरातील रंगकाम मजूराच्या घरी चोरी : झोपलेल्या कुटुंबियांना ओलांडून तीन मोबाईल लांबविले.

Thousands of people stolen from the house of Shahu 44 thousand | शाहू नगरातील घरातून 44 हजारांच्या ऐवजावर चोरटय़ांचा डल्ला

शाहू नगरातील घरातून 44 हजारांच्या ऐवजावर चोरटय़ांचा डल्ला

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.26- शहरातील शाहू नगरातील रोजंदारीवर रंगकाम करणारे ईब्राहिम  सिंकदर तडवी यांच्या घरातून चोरटय़ांनी रोख 40 हजार व तीन मोबाईल असा 44 हजार 500 रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली आह़े 
मुलाला नवीन दुचाकी घेवून घेण्यासाठी त्यांनी पैसे जमविलेले होत़े मात्र त्याआधीच चोरटय़ांनी हात साफ केला़ विशेष म्हणजे दरवाजा उघडा ठेवून घरात दहा जण झोपलेले होत़े त्यांना ओलांडत चाहूल लागू न देता चोरटय़ांनी ही चोरी केली़

Web Title: Thousands of people stolen from the house of Shahu 44 thousand