दोन प्रभागात सापडल्या हजार नवीन मालमत्ता

By Admin | Updated: October 9, 2015 00:25 IST2015-10-09T00:25:20+5:302015-10-09T00:25:20+5:30

जळगाव : प्रभाग समिती क्र.1 व 4 च्या प्रभाग अधिका:यांनी सुरू केलेल्या मोहिमेत करआकारणी न झालेल्या नव्या 1 हजार मालमत्ता आढळल्या आहेत.

Thousands new properties found in two divisions | दोन प्रभागात सापडल्या हजार नवीन मालमत्ता

दोन प्रभागात सापडल्या हजार नवीन मालमत्ता

जळगाव : मनपा प्रभाग समिती क्र.1 व 4 च्या प्रभाग अधिका:यांनी सुरू केलेल्या मोहिमेत करआकारणी न झालेल्या नव्या 1 हजार मालमत्ता आढळल्या आहेत. त्यावर कर आकारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणावर बांधकाम सुरू असून नवीन मालमत्तांची भर पडत आहे. मात्र मनपा दप्तरी नोंद असलेल्या व मालमत्ताकराची आकारणी होत असलेल्या मालमत्तांची संख्या त्या तुलनेत वाढलेली नाही. त्यामुळे प्रभाग समिती 1 व 4च्या प्रभाग अधिका:यांनी नवीन मालमत्तांची शोध मोहीम हाती घेतली असून त्यात आतार्पयत 1 हजार कर आकारणी न झालेल्या नवीन मालमत्ता सापडल्या आहेत. त्यावर कर आकारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

Web Title: Thousands new properties found in two divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.