बारा हजारांचा कचरा चोरला
By Admin | Updated: April 10, 2017 00:31 IST2017-04-10T00:31:56+5:302017-04-10T00:31:56+5:30
सावदा नगरपालिकेने टाकलेला कचरा चोरट्यांनी डम्परच्या सहाय्याने चोरून नेला. या कचºयाची किंमत १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

बारा हजारांचा कचरा चोरला
सावदा : सावदा नगरपालिकेने टाकलेला कचरा चोरट्यांनी डम्परच्या सहाय्याने चोरून नेला. या कचºयाची किंमत १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
चोरट्यांनी पालिकेचा कचरा चोरी केल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती़ कचरा चोरी झाल्याचा अफलातून प्रकार ३ रोजी उघडकीस आल्यानंतर विरोधी गटाच्या पालिका मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन दिले होते, तर सावदा पोलिसात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता़ पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना डंपरसह अटक केली आहे़
दरम्यान ८ रोजी रात्री सावदा पोलिसांनी संशयित आरोपी दत्ता उत्तमराव चांदगुळे (वय ३८, रा.साकरी फाटा, भुसावळ) व सुपडू नुरा भाट (वय ३२, रा.आंदलवाडी ता.रावेर) या दोघांना अटक केली आहे़ या गुन्ह्यात वापरण्यात आलेला डंपरही जप्त केला आहे़
सावदा पोलीस ठाण्यात न.पा. पाणीपुरवठा अभियंता कुणाल पाटील यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता़
पालिकेच्या कचरा डेपोतून ३ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी जेसीबी व ट्रकच्या साहाय्याने सुमारे ४० ते ५० ट्रॉली कचरा चोरून नेला तसेच सुमारे १२ हजार रुपये किमतीचा हा कचरा असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते़ (वार्ताहर)