शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

अटलजींचे विचार भावी पिढीसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:11 IST

वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नेत्यांनी दिला आठवणींना उजाळासर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांची शोकसंवेदनाअटलजींच्या कवितेने झाली सुरुवात

जळगाव : वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.‘अटल अनंतात, अनंत हृदये अटल संगे !’ हा सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात अटलजींनी रचलेल्या 'उनकी याद करे' या कवितेने झाली. या कवितेला जळगावच्या केशव स्मृती प्रतिष्ठानने स्वरबध्द केले होते. त्यानंतर अटलजींवरील ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अटलजी यांचे विचार, कविता व त्यांचे जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती असल्याचे सांगितले. त्यामुळे ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरतील असे त्यांनी सांगितले.माजी खासदार गुणवंतराव सरोदे यांनी अटलजींच्या निधनामुळे एका खऱ्या राष्ट्रभक्ताला मुकलो असल्याचे सांगितले.‘अटलजी म्हणजे पाय जमिनीवर असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व, राजकारणी होते. त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात ८ परिणामकारक निर्णय झाल्याचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खासदार ए.टी.पाटील, जनसंघाचे कार्यकर्ते गजानन जोशी, भुसावळचे आमदार संजय सावकारे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जमिल देशपांडे, आर.पी.आयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, रा.स्व. संघाचे योगेश्वर गर्गे, आम आदमी पार्टीचे ईश्वर मोरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, डॉ.राजेंद्र फडके, जळगांव शहर गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन नारळे, शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिरसाठ, मुकुंद मेटकर यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. शेवटी शांतीमंत्र व दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :JalgaonजळगावAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी