शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

व्हॉटस्‌ॲपने श्रद्धांजलीचे मेसेज पाठविणाऱ्यांनी केला 'लाखोचा' निधी संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 17:14 IST

शिंदाड येथील व्हॉटस्‌ॲप ग्रुपचा हा अनोखा उपक्रम चर्चेत आला आहे.

ठळक मुद्देशिंदाड येथील व्हॉटस्‌ॲप ग्रुपचा अनोखा उपक्रमकोरोनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला आधारस्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र स्वागत

पाचोरा : शिंदाड येथील ' शिंदाड युवा मंच' या व्हॉटस्‌ॲप ग्रुपने एक अनोखा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या ग्रुपने श्रद्धांजलीचे मॅसेज पाठविणारऱ्यांना कोरोनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी आवाहनक केल्यानंतर अनेक जणांनी मदत दिली. यातून लाखाचे निधी संकलन होत आहे.

उदात्त हेतूने निधी संकलनकोरोना महामारीत कुटुंबातील कर्ता पुरुष अचानक मृत्युमुखी पडल्यानंतर अनेकांचे संसार उद्ध्व‌स्त झाले. कुटुंब उघड्यावर पडले. जवळचा मित्र नातेवाईक गावातील व्यक्ती अचानक मरण पावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करून दुरूनच संवेदना व्यक्त केल्या जात आहे. मात्र कुटुंबाला काही आधार दिला जात नाही. व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर सोशल मीडियामार्फत श्रध्दांजली अर्पण करून आपले कर्तव्य संपले, असे होत असतानाच शिंदाड येथील सुज्ञ नागरिकांनी 'आपणही समाजाचे काही देने लागतो 'ह्या उदात्त हेतूने निधी संकलन करून मृत पावलेल्या व्यक्तीच्या पश्चात मदत देण्याची संकल्पना राबवली जात आहे. 

ऐपतीप्रमाणे दिला निधीशिंदाड येथील 'शिंदाड युवा मंच' या व्हॉटस्‌ॲप ग्रुपचे ग्रुप ॲडमिन रमेश पाटील यांनी ग्रुपवर सहज 'भावपूर्ण श्रद्धांजली' मेसेज टाकणाऱ्यांना ग्रुपवर मेसेज टाकून संकल्पना मांडली की, मृत व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली असे मेसेज टाकून मोकळे होण्यापेक्षा आपण त्या परिवाराला आर्थिक मदत केली पाहिजे. तेव्हा ग्रुपमधील सुज्ञ नागरिकांनी आपल्या ऐपतीप्रमाणे १०० रुपयांपासून पुढे रोख रकमेच्या स्वरूपात मदतनिधी गोळा करण्याची संकल्पना व्यक्त केली. या मेसेंजला ग्रुपमधील सर्वानीच उत्तम  प्रतिसाद दिला.

अनेक जण येऊ लागले पुढे'शिंदाड युवा मंच' ह्या ग्रुपच्या सदस्यांनी पाच दिवसात कोरोनाच्या काळात मृत व्यक्तीविषयी भावना व्यक्त करून यथाशक्ती १०० पासून ते पाच हजारांपर्यंतचा निधी ऑनलाईन गोळा केला. पाहता पाहता एक लाखापेक्षाही जास्त निधी गोळा झाला. या निधीचा विनियोग मृत व्यक्तीच्या परिवाराला किराणा साहित्य, तसेच आर्थिक मदत, काही गरीब परिवारातील व्यक्तीला कोरोनाचे उपचारासाठी मदत म्हणून देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गावातील व परिसरातील नागरिकही आता मदतीसाठी पुढे येत असून व्हॉट्सअप ग्रुपच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे ज्या कुटुंबावर संकट कोसळले त्याचा आधार म्हूणून शिंदाड युवा मंच हा ग्रुप आधारस्तंभ म्हणून उभा आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव