शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘गुड बोला-गोड बोला’ : ध्येय व एकनिष्ठता ठेवणाऱ्यांना यश प्राप्त होते - माजी आमदार आर.ओ.पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:20 IST

तिळामध्ये स्रेहभाव

पाचोरा, जि. जळगाव : ‘तिळगुळ घ्या गोड-गोड बोला’ नुसतं बोलण्या इतपत न राहता, खरोखर आचरणात आणणे अपेक्षित आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ली, असे म्हणतात. एवढा स्रेहभाव तिळामध्ये असून तिळाप्रमाणे प्रेम वृद्धींगत व्हावे. गुळाचा गोडवा लागावा असे प्रेम, स्रेहभाग, आपुलकी व जिव्हाळा सर्वांमध्ये निर्माण व्हावा हीच यामागची पवित्र संकल्पना आहे. जीवनात ध्येय गाठण्यासाठी एकनिष्ठता असावी लागते. ध्येय व एकनिष्ठता असणारे मातीशी इमान बाळगणाºयांनाच यश प्राप्त होते, असे पाचोरा येथील माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘गुड बोला-गोड बोला’ यावर बोलताना सांगितले.भारतीय संस्कृतीत एकमेकांना आदराचे स्थान देऊन प्रेम निर्माण केले जाते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत हल्ली दुरावाच निर्माण होत आहे. यातून राग द्वेष, भावना वाढीला लागत आहे. ‘गुड बोल... गोड बोला’ हा संदेश ‘लोकमत’ने सर्वांपर्यंत पोहचवला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेला भरभरून यश दे, त्यांच्या जीवनात गोडी निर्माण व्हावी, सर्वांमध्ये प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा. तिळगुळाप्रमाणे एकजीव रहावे हीच मनोकामना.‘संक्रांत’ हा शब्द ‘संकटरुपी’ असून, सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असतो. दक्षिणायन करून उत्तरायणाकडे वाटचाल करतो. त्याप्रमाणे या संक्रमण काळापासून आपल्या हातून बºया-वाईट सवयी कुणाचे मन दुखावून द्वेष भावना झाली असल्यास त्यांना तीळगूळ देवून आपण त्यात तिळाप्रमाणेच गोडवा निर्माण करूया.

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८Jalgaonजळगाव