थॉम्पसन हेराहचा विक्रम हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:13+5:302021-08-23T04:20:13+5:30

युजीन, अमेरिका : जमैकाची धावपटू आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती इलेनी थॉम्पसन हेराह हिने प्रीफोनटेन क्लासिक स्पर्धेत आपल्या ...

Thompson hooked Herah's record | थॉम्पसन हेराहचा विक्रम हुकला

थॉम्पसन हेराहचा विक्रम हुकला

युजीन, अमेरिका : जमैकाची धावपटू आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती इलेनी थॉम्पसन हेराह हिने प्रीफोनटेन क्लासिक स्पर्धेत आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. मात्र ती फ्लोरेन्स ग्रिफीथ जॉयनर हिचा ३३ वर्षे जुना विक्रम मोडू शकली नाही.

थॉम्पसनने शनिवारी महिलांच्या १०० मीटर शर्यतीत १०.५४ सेकंदांची वेळ नोंदवली. हे तिचे या वर्षातील सर्वोत्तम प्रदर्शन आहे. तिने टोकियोत १०.६१ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले होते. मात्र ती जॉयनरचा १९८८ चा १०.४९ सेकंदांचा विक्रम मोडू शकली.

ऑलिम्पिकप्रमाणेच थॉम्पसननंतर जमैकाचीच शेली एन फ्रेजर प्राइस आणि शेरिका जॅक्सन दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

थॉम्पसन हेराहने सांगितले की, मी थोडी हैराण आहे. कारण गेल्या पाच वर्षात मी इतकी वेगवान धावलेली नव्हती. मी चॅम्पियनशिपमध्ये खूप वेगाने धावले. दोन अठवड्यात दुसऱ्यांदा वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करणे शानदार आहे.’

Web Title: Thompson hooked Herah's record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.