धानोरा येथे ४० हजाराचा गुटका जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:32 IST2019-04-05T22:31:39+5:302019-04-05T22:32:27+5:30

एकास अटक

Thirty thousand rupees were seized in Dhanora | धानोरा येथे ४० हजाराचा गुटका जप्त

धानोरा येथे ४० हजाराचा गुटका जप्त

अडावद ता.चोपडा- धानोरा ता.चोपडा येथुन युवकाकडुन ४० हजार रुपयांचा गुटका अडावद पोलीसांनी जप्त केला. ५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
किराणा दुकानदार शेख आरीफ शेख सलिम (वय२३) याच्याकडे प्रतिबंध असलेला गुटकाच्या मोठा साठा असल्याची गुप्त माहिती अडावद पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि राहुलकुमार पाटील यांनी आपल्या कर्मचा?्यांसह शेख आरीफ याच्या घरी छापा टाकला असता गुटका, सुगंधीत सुपारीचा तब्बल ४१ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. पोलीसांनी मुद्देमाल हस्तगत करुन शेख आरीफ शेख सलिम यास अटक केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास सपोनि राहुलकुमार पाटील हे करित आहे.

 

Web Title: Thirty thousand rupees were seized in Dhanora