आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २ : बहिणीकडे पाहिल्याच्या जुन्या वादातून शेख अजीज शेख लाल (वय २०, रा.गेंदालाल मील, जळगाव) या तरुणाच्या पोटात चाकू चाकू खुपसल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजता गेंदालाल मील भागातील भोंग्याजवळ घडली. जखमी तरुणाला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख अजीज, जमीर खान व पप्पू शेख तस्लीम हे तीन तरुण शनिवारी दुपारी तीन वाजता गेंदालाल मील मधील भोंग्याजवळ गप्पा मारत असताना हाफीज खान हा त्या ठिकाणी आला. शेख अजीज याच्या पोटात चाकूसारखे धारदार शस्त्र खुपसून तेथून पळ काढला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घटनास्थळावर पळापळ झाली. ही घटना समजल्यानंतर शेख याच्या परिवाराने तत्काळ शेख याला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अजीज व हाफीज खान या दोघांमध्ये दोन वर्षापूर्वी वाद झाला होता. हाफीज तेव्हा हा वाद मिटलाही होता. त्यानंतर कोणताही वाद नसताना शनिवारी हाफीज याने हल्ला केला, तसाच जबाबही अजीज याने पोलिसांना दिला आहे. सायंकाळी शहर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात येऊन जबाब नोंदविला. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
बहिणीकडे पाहिल्याच्या रागातून जळगावात तरुणाच्या पोटात खुपसला चाकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 21:14 IST
बहिणीकडे पाहिल्याच्या जुन्या वादातून शेख अजीज शेख लाल (वय २०, रा.गेंदालाल मील, जळगाव) या तरुणाच्या पोटात चाकू चाकू खुपसल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजता गेंदालाल मील भागातील भोंग्याजवळ घडली. जखमी तरुणाला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बहिणीकडे पाहिल्याच्या रागातून जळगावात तरुणाच्या पोटात खुपसला चाकू
ठळक मुद्देजखमीला तातडीने हलविले जिल्हा रुग्णालयातदोन वर्षापूर्वी झाला होता वादपोलिसांनी घेतला जबाब