चोपड्यात तेरा तास वीज गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:23 IST2019-08-17T22:22:30+5:302019-08-17T22:23:20+5:30
ेचोपडा : संपूर्ण तालुकाभरात १७ रोजी सकाळी ८ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत केबल बदलविण्याच्या कारणावरून १३१ केव्ही उपकेंद्रातून वीज ...

चोपड्यात तेरा तास वीज गुल
ेचोपडा : संपूर्ण तालुकाभरात १७ रोजी सकाळी ८ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत केबल बदलविण्याच्या कारणावरून १३१ केव्ही उपकेंद्रातून वीज प्रवाह बंद होता.
दिवसभर उच्च क्षमतेच्या वाहक तारा बदलविण्यासाठी वीज प्रवाह बंद असल्याचे सांगितले जात होते. मात्र दिवसभर वीज प्रवाह खंडित केल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. शहरात अनेक अडचणी आल्याने नागरिकांनी त्रागा केला. कोणत्याही सुचनेशिवाय वीज प्रवाह बंद केल्याने ग्रामीण भागात संताप व्यक्त करण्यात आला.