शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

थर्डपार्टी आॅडीटच संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 10:08 PM

जलयुक्त शिवार योजनेत घोळ

ठळक मुद्देआॅडीट करणाºया संस्थेकडून न मागताच त्रुटी पूर्ततेचे अहवाल सादर आॅडीट तकलादू

जळगाव: जलयुक्त शिवार योजनेच्या दुसºया टप्प्यातील १३ कामांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे ‘ग्रीन होम’ या संस्थेने केलेल्या थर्डपार्टी आॅडीटमध्ये आढळून आल्याने संबंधीत विभाग प्रमुखांना नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला होता. त्याची पडताळणी रोहयोच्या उपअभियंत्यांनी केली असता थर्ड पार्टी आॅडीट करणाºया संस्थेने त्रुटी दूर झालेल्या नसतानाही व संबंधीत विभागांकडून कुठलाही पत्रव्यवहार त्याबाबत झालेला नसतानाही त्रुटी पूर्ततेचे अहवाल दिले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या ‘थर्ड पार्टी आॅडीट’बाबतच संशय निर्माण झाला आहे.२०१९ पर्यंंत ‘सर्वासाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्टÑ’ ही संकल्पना घेऊन जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जिल्'ात २०१६-१७ मध्ये दुसरा टप्पा पार पडला. त्यात २२२ कामे २०१८ उजाडल्यावर पूर्ण झाली. या दुसºया टप्प्याचे थर्ड पार्टी आॅडीट एरंडोल येथील ‘ग्रीन होप’ संस्थेतर्फे करण्यात आले. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार टप्पा २ मधील कृषी विभागाकडील ३, वनविभागाकडील २, जि.प.कडील २, मृद व जलसंधारण विभागाकडील ६ अशा १३ कामांमध्ये दोष आढळून आल्याचे नमूद करण्यात आले. या टप्पा २ मधील कामांमध्ये दोष आढळून आल्याने जिल्हा प्रशासनातर्फे संबंधीत विभाग प्रमुखांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर या विभागप्रमुखांकडून खुलासे सादर झाले. त्या खुलाशांची पडताळणी रोहयोच्या उपअभियंत्यांमार्फत करण्यात येत असून तथ्य आढळल्यास संबंधीत अधिकाºयांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र पडताळीचे काम सुरू होण्यापूर्वीच थर्ड पार्टी आॅडीट करणाºया संस्थेने त्यातील काही कामांच्या त्रुटी दूर करण्यात आल्या असल्याबाबतचा सुधारीत अहवाल सादर केला आहे. प्रत्यक्षात रोहयोच्या अभियंत्यांनी पडताळणी केली असता आधी काढलेल्या त्रुटींची पूर्तता मात्र झालेली नसल्याचे आढळून आले. तसेच संबंधीत संस्थेकडे काम करणाºया विभागाकडून त्रुटींची पूर्तता केल्याबद्दलचा कोणताही पत्रव्यवहार झालेला नसतानाही हा त्रुटी पूर्ततेचा अहवाल देण्याचा खटाटोप संबंधीत संस्थेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या ‘थर्ड पार्टी आॅटीड’बाबतच साशंकता व्यक्त होत आहे.आॅडीट तकलादूजलयुक्त शिवारच्या दुसºया टप्प्यात ३३० कामे होती. त्यातील ३३ टक्केच कामे थर्डपार्टी आॅडीटसाठी देण्यात आली. मात्र संबंधीत विभागांनी चांगली झालेलीच कामे यासाठी दिली नसतील हे कशावरून? असा मुद्दा उपस्थित होत आहे. तसेच उर्वरीत ६७ टक्के कामे चांगल्याच दर्जाची झाली असतील, हे कशावरून? असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या थर्डपार्टी आॅटीडबाबत साशंकता निर्माण झाली आहे.अहवालातील त्रुटीया थर्ड पार्टी अहवालात वरखेड ता.भडगाव येथील तीन सिमेंट नालाबांधांबाबत एकसारखेच आक्षेप घेण्यात आले. त्यात खोलीकरण केले नाही. भराव करून खोलीकरण न केल्याने पाणीसाठा होऊ शकला नाही, अशा स्वरूपाचे आक्षेप घेण्यात आले. मात्र शेºयामध्ये मात्र दोन बंधाºयांना कामे सूचनात्मक म्हणजेच दुरूस्ती करावी, असा शेरा असून तिसºया बंधाºयाला काम निकृष्ट झाल्याचा शेरा देण्यात आला आहे.सोनाली ता.जामनेर येथील तीन बांध बांधण्यात आले. त्यात हे बांध बुडीत क्षेत्रात येत असल्याचा येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र तीन महिन्याच्या आतच संस्थेने सुधारीत अहवाल देत त्यात नाल्याची दिशा वळविल्याने आता बुडीत क्षेत्रात येत नाही असे नमूद करण्यात आले. मात्र पडताळणीत मात्र नाल्याची दिशा बदललेलीच नसल्याचे आढळून आले. अन्य एका कामाबाबत पाणी बांधाचे पिचींग केलेले नसल्याचा आक्षेप होता. त्याच्या सुधारीत अहवालात मात्र त्रुटी दूर केल्याचे नमूद होते. प्रत्यक्षात पिचींग केलेलेच नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संस्थेने सुधारीत अहवाल देण्याचा खटाटोप कशासाठी व कुणाच्या सांगण्यावरून केला? असा सवाल उपस्थित होत आहे.