ई-फेरफार प्रणालीत जळगाव राज्यात तिसऱ्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:57+5:302021-03-04T04:28:57+5:30
ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे अधिकारी, कर्मचारी यांच्या ...

ई-फेरफार प्रणालीत जळगाव राज्यात तिसऱ्या स्थानी
ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे अधिकारी, कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा नियमित घेण्यात आलेला आहे. विभागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अथक मेहनत घेऊन राज्यात ई-फेरफार प्रणालीमधील प्रलंबित फेरफार यांची प्रलंबितता कमी करून विभागातील जनतेला दिलासा देणारे कामकाज केले आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पातील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकाला सोप जावे म्हणून महाभूमी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.
(राज्यातील स्थान, जिल्हा, तालुक्यांची
संख्या, एकुण भरलेल्या नोंदी, प्रमाणित
एकुण नोंदी, एकूण प्रमाणिकरण
टक्केवारी, झालेल्या कामाची टक्केवारी)
1 नंदुरबार, 135779, 133026, 97.97
2 अहमदनगर, 1055817, 1032737, 97.81
3 जळगांव 987982, 672822, 97.80
4 धुळे, 268177, 262167, 97.76
5 नाशिक 647568, 631934 97.59