चोरट्यांनी चोरली साखरेची १५ पोती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST2021-09-18T04:18:18+5:302021-09-18T04:18:18+5:30
पहूर, ता. जामनेर : मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून साखरेची १५ पोती चोरट्यांनी लंपास केली. ही घटना ...

चोरट्यांनी चोरली साखरेची १५ पोती
पहूर, ता. जामनेर : मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून साखरेची १५ पोती चोरट्यांनी लंपास केली. ही घटना जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री घडली.
जांगडा ट्रान्स्पोर्टमार्फत जळगावहून रोज मालाची वाहतूक केली जाते. गुरुवारी रात्री हे वाहन पहूरनजीक अजिंठा ट्रेडर्स पेट्रोल पंपावर उभे होते. त्याचवेळी वाहनाच्या वरच्या भागातील ताडपत्री कापून साखरेची १५ पोती लंपास करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. प्रत्येकी ५० किलो वजनाची ही पोती होती. याची किंमत २६ हजार रुपये आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस कर्मचारी श्रीराम ढाकरे, प्रकाश पाटील यांनी पाहणी करून पंचनामा केला.
दुसरीकडे चोरट्यांनी हिवरी दिगर, ता. जामनेर येथे किराणा दुकान फोडून सहा हजारांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांत दुकान मालक प्रवीण पंडित पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भरत लिंगायत करीत आहेत. याप्रकरणी काही संशयितांची चौकशी करण्यात आली. पहूर परिसरात चोरीच्या घटनांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.