पळासखेडे येथे चोरट्यांचा दोन किराणा दुकानावर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:05+5:302021-09-05T04:20:05+5:30
महिंदळे, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या पळासखेडे येथे चोरट्यांनी बस स्टॅन्ड परिसरात दोन्ही भावांची कन्हय्या किराणा प्रोव्हिजन नावाची ...

पळासखेडे येथे चोरट्यांचा दोन किराणा दुकानावर डल्ला
महिंदळे, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या पळासखेडे येथे चोरट्यांनी बस स्टॅन्ड परिसरात दोन्ही भावांची कन्हय्या किराणा प्रोव्हिजन नावाची दोन दुकाने आहेत. या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी किराणा माल व रोकड लांबवली.
पळासखेडे येथील मोतीलाल भागचंद वंजारी व शांताराम भागचंद वंजारी या दोन्ही भावांची किराणा दुकाने आहेत. रात्री दहा वाजता दुकाने बंद करून ते घरी गेले. मात्र रात्री चोरट्यांनी या दोन्ही दुकानाचे शटरचे कुलूप तोडून किराणा मालासह दुकानात असलेली रोकड लांबवली.
सकाळी दोन्ही भाऊ दुकान उघडण्यासाठी गेले असता शटरचे कुलूप तोडलेले दिसले व दुकानात सर्व साहित्ये इकडे तिकडे फेकलेले दिसले व दुकानातील रोकडही दिसली नाही. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महिंदळे येथेही घरफोडीचा प्रयत्न फसला
महिंदळे येथेही रात्री माजी सैनिक नामदेव बाबुलाल सैंदाणे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील साहित्ये इकडे तिकडे फेकले. मात्र चोरट्याना तेथून खाली हात जावे लागले.
माजी सैनिक नामदेव सैंदाणे व पत्नी वरच्या मजल्यावर राहतात. रात्री चोरट्यांनी ते झोपलेल्या वरच्या मजल्यावरील दाराची कधी बाहेरून बंद करून खालच्या मजल्याच्या दाराचे कुलूप तोडून कपाट फोडले; परंतु कपाटात काहीच नसल्यामुळे फक्त रिकामे साहित्य होते. चोरट्याना बंद घर दिसल्याने त्यांनी तेथे घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. पण घरात काहीच नसल्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
हा प्रकार सकाळी उठल्यावर दरवाजा बाहेरून बंद असल्यामुळे लक्षात आला. सुदैवाने त्यांच्या घरातील काहीच चोरीला गेले नाही. फक्त चोरटे घराचे कुलूप घेऊन गेले.
याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास गीते करत आहेत.
040921\04jal_10_04092021_12.jpg
पळासखेडे येथील चोरट्यांनी फोडलेले किराणा दुकान.