चोरांचा मोर्चा आता वायर चोरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:40+5:302021-06-11T04:11:40+5:30

ग्रामीण भागात शेतातून अशा वायर चोरीच्या घटना नेहमी सुरू असताना आता चोरट्यांनी शहरातील आनंदनगर भागातील बीएसएनएल कंपनीच्या ...

Thieves march now to wire theft | चोरांचा मोर्चा आता वायर चोरीकडे

चोरांचा मोर्चा आता वायर चोरीकडे

Next

ग्रामीण भागात शेतातून अशा वायर चोरीच्या घटना नेहमी सुरू असताना आता चोरट्यांनी शहरातील आनंदनगर भागातील बीएसएनएल कंपनीच्या कार्यालयातून ६ हजार रुपये किमतीची

कॉपर वायर लंपास केल्याची घटना ७ रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाॅटेल रंगोलीजवळ आनंद नगर परिसरात बीएसएनएल कार्यालय आहे. या कार्यालयाचा समोरील भागाचा दरवाजा उघडून चोरट्याने टेबलवर ठेवलेल्या ६ हजार रुपये किमतीची कॉपर वायर ७ रोजी लांबवली. सकाळी १० वाजता कंत्राटी कर्मचारी सतीश बोदडे हा कामावर आल्यानंतर त्याच्या निदर्शनास हा प्रकार आला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत कनिष्ठ दूरसंचार अधिकारी मोहम्मद रिजवान शेख (रा. गल्ली नंबर तीन, नूराणी मशिदीजवळ, खडका रोड) यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सत्र सुरूच आहे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Thieves march now to wire theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.