चोरट्यांनी लांबविले शेतातून पाईप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST2021-08-21T04:20:17+5:302021-08-21T04:20:17+5:30
जळगाव : सुप्रिम कंपनीजवळील जफरोद्दीन पिरजादे (रा.पिरजादे वाडा, जळगाव) यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांन ३० हजार रूपये किंमतीचे पाईप चोरून ...

चोरट्यांनी लांबविले शेतातून पाईप
जळगाव : सुप्रिम कंपनीजवळील जफरोद्दीन पिरजादे (रा.पिरजादे वाडा, जळगाव) यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांन ३० हजार रूपये किंमतीचे पाईप चोरून नेले. ही घटना १९ रोजी, सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिरजादे वाडा येथे जफरोद्दीन पिरजादे हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. सुप्रीम कंपनीजवळ त्यांचे शेत असून शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी त्यांनी एका चिंचेच्या झाडाखाली ३५ पाईप ठेवले होते. मात्र, अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. १९ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता पिरजादे हे शेतात आल्यानंतर त्यांना पाईप चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.