शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शिवकॉलनीतील बंद घरात चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:09 IST

१० हजाराची रोकड लंपास : पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव - शहरातील शिवकॉलनी येथील चंद्रकांत मोहन बाविस्कर यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातून दहा हजारांची रोकड लंपास केली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.चंद्रकांत बाविस्कर हे कुटुंबासह शिव कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. हातमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २ मार्च रोजी नातेवाइकांकडे ते काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून गेले होते. बंद घर असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले १० हजार रुपयांची रोकड लंपास केली. गुरुवारी चंद्रकांत बाविस्कर हे गावाहून परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरात जाऊन पाहिले असता कपाटातील रक्कम दिसून आली नाही. चंद्रकांत बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उषा सोनवणे करीत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव