शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन घर फोडले; १ लाख २० हजाराचा ऐवज लंपास

By सागर दुबे | Updated: April 12, 2023 14:41 IST

वाढत्या चोरीच्या घटनांनी पोलिसांची झोप उडविली

जळगाव : जळगाव शहरामध्ये पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून शिवाजीनगर, स्टेट बँक कॉलनी आणि नशेमन कॉलनीतील बंद घरांमध्ये डल्ला मारून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण १ लाख ३० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांची झोप उडाली असून याप्रकरणी रामानंदनगर, शहर आणि एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

चाचणी विभागातील कार्यकारी अभियंता प्रदीप आबाजी सोरटे हे स्टेट बँक कॉलनी येथील लोटन शिंपी यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात. ५ एप्रिल रोजी सोरटे कुटूंबिय घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा ऐवज चोरून नेला. रविवार, दि. ९ एप्रिल रोजी घरमालक शिंपी यांना सोरटे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला, त्यांना घरात जावून पाहिल्यानंतर चोरी झाल्याची घटना समोर आली. त्यांनी सोरटे कुटूंबियांना संपर्क साधून त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याची माहिती दिली.

दुस-या दिवशी सोमवारी सोरटे कुटूंबियांनी घर गाठले. त्यावेळी त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. तर ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे कानातले, १० हजार रूपये किंमतीचे चांदीचे सामान, १० किंमतीचे चांदीचे कडे, १ हजार २०० रूपयांचे चांदीचे शिक्के, १५ हजार रूपये किंमतीचा टीव्ही, ४ हजार रूपये किंमतीचे चांदीचे मंगळसूत्र, १० हजार रूपये किंमतीचे घड्याळ असा एकूण ८५ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. अखेर प्रदीप सोरटे यांनी मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कौन है...कौन है...म्हणताच पळाला चोरटा

शिवाजीनगर येथे प्रेमलता विनोद तिवारी या पती, मुलगा व मुलीसह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती एमआयडीसीतील बीएचआर संस्था येथे सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहेत. सोमवारी ते रात्री ड्युटीला गेले होते. जेवणानंतर प्रेमलता तिवारी यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी लागत नसल्यामुळे दोरीने दरवाजा बंद केला होता होता. मंगळवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास खोली मधला अचानक लाईट सुरू झाल्यामुळे प्रेमलता यांना जाग आली. ड्युटीहून पती घरी आले असावे, म्हणून त्यांनी आजू-बाजूला पाहिले. तेव्हा त्यांना दरवाजा उघडा दिसला आणि बाहेर एक व्यक्ती दिसून आला. कौन है...कौन है..असे आवाज दिल्यानंतर तो व्यक्ती तेथून पळून गेला. दरम्यान, प्रेमलता यांना घरातील २ मोबाईल आणि पगाराचे १५ हजार रूपयांची रोकड दिसून आली नाही. त्यामुळे आपल्या घरात चोरी झाल्याची खात्री त्यांना झाली. अखेर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.दरवाजा उघडा ठेवणे पडले महागात

नशेमन कॉलनी येथे हिसाहक इब्राहीम रंगरेज हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी सोमवारी दुपारी डल्ला मारला. घरातून १५ हजार रूपयांची रोकड आणि काही महत्वाची कागदपत्रे चोरून नेली आहेत. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :RobberyचोरीJalgaonजळगावPoliceपोलिस