चोरीच्या दुचाकींसह चोरटे जेरंबद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:37+5:302021-09-07T04:22:37+5:30
जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील तीन संशयितांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ...

चोरीच्या दुचाकींसह चोरटे जेरंबद
जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील तीन संशयितांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मुसक्या आवळल्या आहेत. सलीम शेख शब्बीर उर्फ तस्या (२८, मदिना कॉलनी, रावेर) व शंकर ज्ञानदेव दहिकार (४०, टुणकी, ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा) आणि मिलींद पुंडलिक जोशी रा. वाघ नगर जळगाव अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत
संशयित तस्लीम याने चोरीची दुचाकी शंकर दहिकार याला विक्री केली होती तर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या मुकूंंदा सुरवाडे रा. वांजोळा रोड, भुसावळ याने भुसावळातून चोरलेली दुचाकी मिलिंद जोशी याला विकली होती. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी विकत घेणार्यांनाही गुन्ह्यात आरोपी करत अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोहेकॉ रमेश चौधरी, पोलीस नाईक गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, योगेश बारी यांनी ही कारवाई केली.