जळगाव : शिवाजीनगर परिसरातील शिस्तीया पार्कमधील रहिवासी शेख नसीर शेख बुढन यांच्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीतून १९ कबुतरांसह टेबल फॅन व किरकोळ ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी शेख नसीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शिस्तीया पार्क येथे शेख नसीर शेख बुढन हे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे़ त्यांची दुमजली इमारत असून दुसºया मजल्यावरील इमारतीवर त्यांनी पाळीव १९ कबुतर व घरातील काही साहित्य ठेवलेले होते़ दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने शेख नसीन यांच्या घराच्या दुसºया मजल्यावरील खोलीचा कुलुप उघडून १५ हजार रूपये किंमतीचे १९ कबुतर १ हजार ७०० रूपयांचा टेबल फॅन व किरकोळ साहित्य चोरून नेले़जाग आल्यानंतर सकाळी ७ वाजेच्या सुमारास नसीर शेख हे नेहमीप्रमाणे दुसºया मजल्यावर गेले़ त्यावेळी त्यांना दरवाज्याचे कुलुप उघडे आढळून आले़ खोलीत प्रवेश केल्यानंतर त्यांना टेबल फॅन व त्यांचे पाळीव १९ कबुतर चोरीला गेल्याचे सिून आले़ त्यानंतर त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ अखेर शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़
१९ कबुतरांसह चोरट्यांनी लांबविले टेबल फॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:23 IST