चोरीच्या दोन दुचाकीसह चोरटा जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:18 IST2021-08-29T04:18:43+5:302021-08-29T04:18:43+5:30

जळगाव : चोरीच्या दोन दुचाकीसह किरण भगवान चौधरी (वय ३३, रा.म्हैसवाडी, पो.बामणोद, ता.यावल) याला जिल्हा पेठ पोलिसांनी नवीन बस ...

In the thief's trap with two stolen bikes | चोरीच्या दोन दुचाकीसह चोरटा जाळ्यात

चोरीच्या दोन दुचाकीसह चोरटा जाळ्यात

जळगाव : चोरीच्या दोन दुचाकीसह किरण भगवान चौधरी (वय ३३, रा.म्हैसवाडी, पो.बामणोद, ता.यावल) याला जिल्हा पेठ पोलिसांनी नवीन बस स्थानक परिसरातून अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून किरण चौधरी याने दोन दुचाकी चोरल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळाली होती. तो २६ रोजी जळगावात बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाकोडे यांनी सहायक निरीक्षक महेंद्र वाघमारे, हवालदार फिरोज तडवी, अशोक सनगत, योगेश साबळे व विकास पहूरकर यांना सोबत घेऊन सापळा लावला. किरण याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने दोन दुचाकी चोरल्याची कबुली देत त्या शनिवारी काढून दिल्या. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: In the thief's trap with two stolen bikes