चोरीची दुचाकी विक्री करताना चोरट्याला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:17 IST2021-05-09T04:17:03+5:302021-05-09T04:17:03+5:30
फोटो... लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चोरीची दुचाकी ग्राहकाला विक्री करतानाच डिगंबर रवींद्र सोनवणे (२२, रा. भोकर, ता. जळगाव) ...

चोरीची दुचाकी विक्री करताना चोरट्याला पकडले
फोटो...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चोरीची दुचाकी ग्राहकाला विक्री करतानाच डिगंबर रवींद्र सोनवणे (२२, रा. भोकर, ता. जळगाव) या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी गोरगावले, ता. चोपडा येथे रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
भोकर येथील तरुण चोपडा तालुक्यात चोरीच्या दुचाकी विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज शिंदे यांना मिळाली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करून संशयिताला पकडण्याचे नियोजन केले. डिगंबर सोनवणे याच्याकडे दुचाकी खरेदीसाठी शनिवारी एक डमी ग्राहक पाठवून त्याला रंगेहाथ पकडले. अधिकच्या चौकशीत चोपडा येथून या दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यातील एक दुचाकी वैजापूर येथे विक्री केली होती. ती पथकाने ताब्यात घेतली. अंतिम कारवाईनंतर सोनवणे याला चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.