चोरटे शिरजोर....मंदिरही नाही सोडत, यावल तालुक्यातील किनगाव येथे मारुती मंदिराची दानपेटी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:46 PM2020-02-05T12:46:07+5:302020-02-05T12:46:51+5:30

रक्कम समजेना

Thief case in kingaon temple | चोरटे शिरजोर....मंदिरही नाही सोडत, यावल तालुक्यातील किनगाव येथे मारुती मंदिराची दानपेटी फोडली

चोरटे शिरजोर....मंदिरही नाही सोडत, यावल तालुक्यातील किनगाव येथे मारुती मंदिराची दानपेटी फोडली

googlenewsNext

यावल, जि. जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथील मारुती मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडली. मात्र दानपेटीतून किती रक्कम चोरीस गेली हे मात्र समजू शकले नाही.
दानपेटीतील रक्कम चोरट्यांंनी फोडण्याचे वृत्त किनगाव बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावात पसरताच मंदिर परीसरात मोठा जमाव जमला. पोलीस निरीक्षक अरूण धनवडे व सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. गावात शांतता आहे.

Web Title: Thief case in kingaon temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव