दगडफेक करीत चोरट्यांना पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:14 IST2019-05-13T18:14:07+5:302019-05-13T18:14:43+5:30
दोन ठिकाणी प्रयत्न : चोरटे गेले रिकाम्या हाती

दगडफेक करीत चोरट्यांना पळविले
एरंडोल : येथे साई गजानन नगरात घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली. ही घटना रविवारी पहाटे झाली. यावेळी घरात चोरट्यांना काहीच हाती लागले नाही. यानंतर त्यांनी गुरुकुल कॉलनीतील राकेश पाटील यांच्या बंद घराकडे मोर्चा वळविला. त्याठिकाणी शेजारी देवल रवींद्र राजपूत व त्यांचे वडील रवींद्र राजपूत यांनी धैर्य दाखवून गच्चीवरून चोरट्यांना दगड मारले असता चोरट्यांनी तेथून पळ काढला.
चोरटे पळून जात असताना चोरीसाठी लागणाऱ्या त्यांच्या सामानाची बॅग खाली पडली. देवल या पदवीधर युवकाच्या पराक्रमी व धाडसी कामगिरीमुळे चोरांना पलायन करणे भाग पडले. दरम्यान चोराच्या बॅगेत दोन लोखंडी टॉमी, पाण्याचे दोन बाटल्या, रुमाल व इतर साहित्य मिळून आले ते पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
दरम्यान, साई नगरात शिंदे नामक फौजीकडे झालेल्या २ लाख ५० हजाराच्या चोरीला पंधरा दिवस झाले तोवर पुन्हा या भागात चोरट्यांनी हैदोस सुरू केला आहे.