नित्याचीच झाली वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 20:32 IST2021-01-07T20:32:50+5:302021-01-07T20:32:56+5:30
बोदवडकर झाले हैराण, उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

नित्याचीच झाली वाहतुकीची कोंडी
बोदवड : जामनेर-मुक्ताईनगर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बोदवड शहरातील मलकापूर चौफुली सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रस्त आहे. दररोज या ठिकाणाहून जाणारी तालुक्यातील ग्रामीण भागातील लहान मोठी वाहने व त्याच प्रमाणे खाद्यपदार्थांच्या गाड्या व भर रस्त्यात बाजूलाच लावणाल्या जाणाऱ्या दुचकी यामुळे दररोज या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. तर याकडे नगरपंचायत तसेच पोलीस प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज असून, अनेक वेळा रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबच रांगा लागतात. त्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी एक वाहतूक नियंत्रक नेमण्याची गरज आहे