भाजपकडून प्रतिसाद नसल्याने ‘मविआ’कडून सुरू झाली मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:48+5:302021-09-24T04:18:48+5:30

जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकीकडे सर्वपक्षीय पॅनलच्या चर्चा असताना, दुसरीकडे भाजपने स्वबळाची तयारी केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षांनीदेखील ...

As there was no response from the BJP, the formation of the front started from 'Mavia' | भाजपकडून प्रतिसाद नसल्याने ‘मविआ’कडून सुरू झाली मोर्चेबांधणी

भाजपकडून प्रतिसाद नसल्याने ‘मविआ’कडून सुरू झाली मोर्चेबांधणी

जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकीकडे सर्वपक्षीय पॅनलच्या चर्चा असताना, दुसरीकडे भाजपने स्वबळाची तयारी केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षांनीदेखील स्वबळाची तयारी केली आहे. याबाबत महाविआच्या नेत्यांची प्राथमिक चर्चादेखील झाली असून, लवकरच मविआच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. तसेच इच्छुकांच्या नावावर प्राथमिक चर्चा झाली असून, प्रत्येक मतदारसंघानिहाय यादी तयार झाल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रशासकीयदृष्ट्या तयारी सुरू असून, २५ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल तयार करून, ही निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी होती. मात्र, भाजपकडून या पॅनलमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाला विरोध आहे. तर दुसरीकडे खडसे यांच्याशिवाय पॅनल तयार होणार नाही अशी भूमिका मविआतील नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. भाजपची तयारी पाहून आता मविआतील पक्षांच्या नेत्यांनीही स्वबळाची तयारी सुरू केली असून, लवकरच याबाबत बैठक घेण्याचे नियोजन आहे.

सावकारेंचे नाव भाजपसोबत मविआच्याही यादीत

भाजपच्या संभाव्य यादीमध्ये भुसावळ मतदारसंघातून संजय सावकारे यांचे नाव देण्यात आले होते. मात्र, आता महाविकास आघाडीकडून देण्यात आलेल्या नावांच्या यादीतदेखील भुसावळमधून संजय सावकारे यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे सावकारे कोणाकडे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुसावळमधून सावकारे यांच्या नावासोबतच संतोष चौधरी यांचेही नाव आहे.

खडसेंचे नाव निश्चित झाल्यास मविआतही फुट?

मुक्ताईनगर मतदार संघातून महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, याच मतदासंघातून आमदार चंद्रकांत पाटील हे देखील आग्रही आहेत. या मतदार संघात एकनाथ खडसे यांचे नाव निश्चित झाल्यास चंद्रकांत पाटील हे भाजपच्या पॅनलकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. सहकारी संस्थाच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण नसल्याने पाटील भाजपकडूनही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

खडसे- महाजन येणार आमने-सामने

सर्वपक्षीय पॅनलव्दारे दोन्ही कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे व गिरीश महाजन हे एकत्र येतील, अशी चर्चा होती. मात्र, सध्याचा हालचाली पाहता, जिल्हा बँकेची निवडणूक एकनाथ खडसे विरुध्द गिरीश महाजन यांच्यातच होण्याची शक्यता वाढली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे अजूनही सर्वपक्षीय पॅनलबाबत आग्रही असले तरी सर्वपक्षीय पॅनलवर खडसे-महाजन यांच्या वादामुळे जिल्हा बँकेची निवडणूक ही बिनविरोध न होता, आखाड्यातच होण्याची शक्यता बळावत जात आहे.

मविआच्या संभाव्य उमेदवारांची यादी

चाळीसगाव - राजीव देशमुख किंवा प्रदीप देशमुख

भडगाव - प्रताप पाटील किंवा नानासाहेब देशमुख

पाचोरा - किशोर पाटील

अमळनेर - अनिल पाटील

पारोळा - चिमणराव पाटील

एरंडोल - अमोल पाटील किंवा विजय महाजन

चोपडा - सुरेश पाटील, कैलास पाटील, अतुल ठाकरे

जळगाव - लक्ष्मण पाटील (लकी टेलर)

धरणगाव - संजय पवार, सुरेश चौधरी

यावल - गणेश नेहते, आर.जी.पाटील, विनोद पाटील

भुसावळ - संजय सावकारे किंवा संतोष चौधरी,

बोदवड - ॲड.रवींद्र पाटील किंवा मधुकर राणे

मुक्ताईनगर - एकनाथ खडसे किंवा चंद्रकांत पाटील

रावेर - अरुण पाटील किंवा राजीव पाटील

जामनेर - नाव अद्याप जाहीर नाही

महिला - ॲड.रोहिणी खडसे, डॉ.अस्मिता पाटील, तिलोत्तमा पाटील व संगीता भंगाळे,

इतर मतदार संघ - गुलाबराव देवकर,

ओबीसी - डॉ.सतीश पाटील, वाल्मीक पाटील,

एस-एसटी - प्रा.चंद्रकांत सोनवणे,

एन.टी- मेहताबसिंह नाईक

Web Title: As there was no response from the BJP, the formation of the front started from 'Mavia'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.