शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

कष्ट मुक्ती योजनेंतर्गत उच्च शिक्षणात मेहतरांसाठी दोन टक्के जागा असाव्यात : रामुजी पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:53 IST

कष्टमुक्ती योजनेअंतर्गत उच्च शिक्षणात वाल्मिकी मेहतर समाजासाठी दोन जागा राखीव असाव्यात. त्यांना कालबद्धतेने घरे मिळावीत. शासकीय नियम व निकषांवर सफाई कामगारांची संख्या असावी, अशी मागणी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी केली आहे.

ठळक मुद्देअमळनेरला सफाई कर्मचाऱ्यांबाबबतचे शासन निर्णय, परिपत्रके, कार्यवाहीबाबत पालिकेत झाली सकारात्मक बैठकस्वच्छ सर्वेक्षण योजनेत जे सफाई कामगार चांगले काम करतील त्यांना गौरविणार

अमळनेर, जि.जळगाव : कष्टमुक्ती योजनेअंतर्गत उच्च शिक्षणात वाल्मिकी मेहतर समाजासाठी दोन जागा राखीव असाव्यात. त्यांना कालबद्धतेने घरे मिळावीत. शासकीय नियम व निकषांवर सफाई कामगारांची संख्या असावी, अशी मागणी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.एक हजार लोकसंख्येला पाच सफाई कामगार असावेत असा नियम आहे. मात्र प्रत्यक्षात एक हजारामागे एकच सफाई कामगार नियुक्त केला जातो, हे गैर असल्याची खंतही पवार यांनी व्यक्त केली.दरम्यान, पवार यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेत विशेष बैठक झाली. त्यात नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. बैठक खेळीमेळीच्या वातावरणात व सकारात्मक झाली.बैठकीत देण्यात आलेली माहिती, चर्चा व निर्णय असे : पालिकेत हल्ली ३८५ सफाई कामगार आहेत.पालिकेची क्षेत्र वाढ व हद्दवाढीच्या पार्श्वभूमीवर कामगारांची नवीन पद भरती केलेली नाही. नियम व निकषाप्रमाणे ती करावी. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार लाड समितीची शिफारस लागू करण्यात आली आहे. कामगारांची पदे रिक्त नाहीत. त्यांना साहित्य पुरविण्यात येते. २०१७-१८पासून गणवेश दिले जात आहेत. सुशिक्षित सफाई कामगारांना शैक्षणिक गुणवत्तेनुसार सफाई कामाव्यतिरिक्त इतर पदांवर पदोन्नती दिलेली नाही. मात्र त्यांना कार्यालयात संगणक आॅपरेटर व तत्सम कामे दिली जातात. यावर पदवीधर कामगारांना नियमाप्रमाणे तत्काळ वर्ग तीनच्या सेवेत घ्यावे असे पवार यांनी सांगितले. पालिकेने सफाई कामगारांसाठी ८० निवासस्थाने बांधलेली असून ६७ घरे वापरात आहेत, असे पालिकेतर्फे सांगण्यात आल्यावर पवार म्हणाले की, सफाई कामगारांना १०० टक्के घरे मोफत दिली पाहिजे. त्यांच्याकडून १० टक्के रक्कम घेणे चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसफल्य आवास योजनेअंतर्गत सहा महिन्यात कार्यवाही करावी.ते पुढे म्हणाले की,सफाई कामगार ३० वर्षे निवास करीत असलेले घर त्यांच्या नावे करावे. अशा लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यावर पुढील कार्यवाही करा. सफाई कामगारांना शासकीय सुट्ट्या दिल्या पाहिजेत. काही अत्यावश्यक काम निघाल्यास संबंधित कामगारांना बोलावून त्यांच्याकडून ते काम करून घ्यावे. मात्र त्यास मजुरी द्यावी. पालिकेच्या जनरल फंडातून पाच टक्के निधी सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी राखून ठेवावा. दर महिन्याच्या एक तारखेला कामगारांचे वेतन अदा झाले पाहिजे. हवे तर ज्यांची बाजारात पत आहे अशा कर्मचाºयांचे पगार नंतर करावेत. सेफ्टी टॅन्क उपसणाºया कामगारांना सुरक्षा मिळावी यासाठी मास्क, हातमोजे व अन्य साहित्य द्यावे. हे काम करताना ज्या कामगाराचा मृत्यू होईल त्याच्या वारसांना दहा लाख रुपयांची भरपाई देण्याची तरतूद आहे. दलित वस्तीत सांस्कृतिक भवन व वाचनालय आवश्यक आहे. दलित वस्तीसाठीचा निधी अन्यत्र वळवू नये. लाड समितीच्या शिफारसिप्रमाणे कामगारांना आरोग्य संवर्धनासाठी दरमहा ५० रुपये भत्ता दिला जातो. तो १०० रुपये करावा. ही मागणी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी तत्काळ मान्य केली. अर्जित रजा, कालबद्ध पद्धतीने पदोन्नती बाबतीत व पगारातील कपातीबाबत शासकीय नियम व निकषांची अमलबजावणी व्हावी.पालिकेने कामगारांशी सौजन्याने वागावे. कामगारांनीही संबंधितांशी सनदशीर भाषेत बोलावे.स्वच्छ सर्वेक्षण योजनेत जो सफाई कामगार चांगले काम करेल त्याला पाच -दहा हजार रुपये देऊन गौरविण्यात यावे.पालिकेच्या व्यापारी संकुलात एक टक्के दुकाने सफाई कामगारांच्या आश्रित घटकांसाठी राखीव ठेवावेत.पुष्पलता पाटील व शोभा बाविस्कर यांनी मनोगतातून पवार यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा ऋणनिर्देश केला. पवार यांनी केलेल्या सूचनांची अमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.नगरसेविका माया लोहेरे यांनी पवार यांचा सत्कार केला. संजय चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. कामगार नेते रामचंद्र पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :agitationआंदोलनAmalnerअमळनेर