पदवी, पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमात कपात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:29 AM2021-02-06T04:29:12+5:302021-02-06T04:29:12+5:30

जळगाव : १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यास शासनाची परवानगी मिळाली असली तरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील महाविद्यालये ...

There is no reduction in undergraduate, postgraduate courses | पदवी, पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमात कपात नाही

पदवी, पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमात कपात नाही

Next

जळगाव : १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यास शासनाची परवानगी मिळाली असली तरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील महाविद्यालये उघडणार आहेत. सोमवारी तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांना परवानगीसाठीचे पत्र विद्यापीठाकडून पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात कुठलीही कपात केली जाणार नसल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दुपारी झालेल्या विद्या परिषद व प्राचार्यांच्या ऑनलाईन बैठकीत दिली. कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही बैठका पार पडल्या. पन्नास टक्के क्षमतेने महाविद्यालय सुरू करावयाची असून विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, अशा सूचना कुलगुरूंनी केल्या आहेत. ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पध्दतीने अध्यापन केले जाणार आहे. शंभर टक्के अभ्यासक्रम असणार असून त्यात कुठलीही कपात केलेली नाही. प्रात्यक्षिकासाठी उपस्थित राहता येणार नसल्यामुळे ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक देता येणार आहे.

Web Title: There is no reduction in undergraduate, postgraduate courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.