कॉपी पुरविण्यावरून दोन गटात हाणामारी

By Admin | Updated: March 4, 2015 15:11 IST2015-03-04T15:11:26+5:302015-03-04T15:11:26+5:30

दहावीच्या परीक्षेला कॉपी करू देत नाही म्हणून वर्गात जाऊन एका शिक्षकाला बाहेरील काही परीक्षार्थींच्या नातेवाइकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ग.स.हायस्कूलमध्ये घडल्याचे समजते.

There are two groups of copies of providing copies | कॉपी पुरविण्यावरून दोन गटात हाणामारी

कॉपी पुरविण्यावरून दोन गटात हाणामारी

अमळनेर : दहावीच्या परीक्षेला कॉपी करू देत नाही म्हणून वर्गात जाऊन एका शिक्षकाला बाहेरील काही परीक्षार्थींच्या नातेवाइकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ग.स.हायस्कूलमध्ये घडल्याचे समजते.
मराठीच्या पेपरला कॉपी करू देत नाही, म्हणून परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी परीक्षा कक्षात जाऊन पर्यवेक्षकाशी हुज्जत घातली व संघटितरीत्या एकत्रित येऊन कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. होमगार्डला न जुमानता सरळ वर्गात जाऊन शिक्षकाला दमबाजी करीत मारहाणीचा प्रयत्न केला. शाळेबाहेर गोंधळ घालणार्‍या परीक्षार्थींच्या नातेवाइकांमुळे शिक्षकांमध्ये दहशत पसरली असून पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील शिरुड येथेही परीक्षा सुरळीत सुरू असताना बाहेरील गोंधळ घालणार्‍यांनी धावपळ करताना शाळेनजीकच्या मक्याच्या शेतात पिकाचे नुकसान केल्याची ओरड शेतमालकाने केली आहे. (वार्ताहर) पारोळा : /कॉपी पुरविण्याच्या वादातून पारोळ्यात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात आठ जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी डॉ.व्ही.एन. जैन माध्यमिक विद्यालयाच्या आवारात पेपर सुटल्यानंतर घडली. 
दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. आज मराठीचा पेपर होता. अमळनेर रस्त्यावर असलेल्या डॉ. व्ही.एन. जैन माध्यमिक विद्यालयाच्या आवारात सकाळी साडेअकरानंतरच कॉपी पुरविणार्‍यांचा सुळसुळाट सुरू झाला होता. पेपर सुटल्यानंतर कॉपी पुरविण्याच्या वादातून विद्यालयाच्या आवारातच दोन गट आपसात भिडले. त्यांच्यात तू-तू मै मै झाल्यानंतर त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. हाणामारीत आठ जण जखमी झाले. 
जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यावर जखमींना धुळे व जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 
दरम्यान, पेपर सुटल्याबरोबर विद्यालयाच्या आवारात तुंबळ हाणामारी सुरू झाल्याने, विद्यार्थी विद्यार्थिनी सैरावैरा पुळू लागल्या होत्या. शिक्षकांनी या सर्वांना आत घेत दरवाजे बंद करून घेतले होते. 


पोलीस पथके दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, उपनिरीक्षक देवीदास बिर्‍हाडे, यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी जळगाव, अमळनेर, कासोदा, धरणगाव या ठिकाणाहून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
(वार्ताहर)

Web Title: There are two groups of copies of providing copies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.