एमआयडीसीत कामगारांनीच केली कंपनीत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:32 IST2020-12-15T04:32:35+5:302020-12-15T04:32:35+5:30

दोघे कामगार कंपनीत कामाला आहेत. प्लास्टिक दाणे असलेल्या कच्च्या मालाच्या १२ गोण्या या कामगारांनी चोरल्या. एका गोणीत ६० किलो ...

The theft was committed by the workers of MIDC | एमआयडीसीत कामगारांनीच केली कंपनीत चोरी

एमआयडीसीत कामगारांनीच केली कंपनीत चोरी

दोघे कामगार कंपनीत कामाला आहेत. प्लास्टिक दाणे असलेल्या कच्च्या मालाच्या १२ गोण्या या कामगारांनी चोरल्या. एका गोणीत ६० किलो माल असून २४ हजारांच्यावर या मालाची किमत आहे. दोघांच्या चौकशीत त्यांनी याआधी देखील चोरी केलेली असून हसन अली नावाच्या व्यक्तीला २ ते ३ हजार रुपयात हा माल विक्री केल्याचे उघड झाले. दरम्यान, या दोघांच्या कबुलीचा व्हिडिओ मालकाने तयार केलेला आहे. त्यात दोघंही चोरटे आपले नाव सांगतात तसेच मालाची कुठे विक्री केली, याआधी किती वेळी चोरी केली याचा उल्लेखही त्यांच्या बोलण्यातून येत होता. यावेळी पोलीस वाहनही दिसून येत आहे. रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथे तक्रार देणे टाळले. मालकाने दोघा चोरट्यांना चोप दिला आहे.

Web Title: The theft was committed by the workers of MIDC