वडगाव टेक येथे चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:56+5:302021-09-05T04:21:56+5:30
पाचोरा : घरातील लोक पुढच्या खोली झोपले असताना चोरट्यांनी मागील दरवाज्याचे ग्रील तोडून सोन्याचे दागिने रोख रकमेसह १ लाख ...

वडगाव टेक येथे चोरी
पाचोरा : घरातील लोक पुढच्या खोली झोपले असताना चोरट्यांनी मागील दरवाज्याचे ग्रील तोडून सोन्याचे दागिने रोख रकमेसह १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना वडगाव टेक येथे शुक्रवारी रात्री घडली.
वडगाव टेक येथील विजय दिलीप पाटील पुढच्या खोलीत झोपले होते. शुक्रवारी रात्री घराच्या मागील दरवाजाचे ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी पेटी व पत्राची कोठी बाहेर घेऊन गेले व त्यातील ८७ हजाराचे सोन्याचे दागिने,४०हजार रुपये रोख शंभर पाचशेच्या नोटा, व अंगणातील ८ हजार किमतीची बकरी असा १ लाख ३५हजार किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला
आहे. तपास पीएसआय गणेश चोभे करीत आहे.