फत्तेपूरतच्या दुचाकी चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 20:35 IST2017-09-21T20:32:40+5:302017-09-21T20:35:36+5:30
कुसुंबा जकात नाक्याजवळ वॉशिंग सेंटरवरुन दुचाकी चोरणाºया दीपक रामचंद्र वनारे (वय ३० रा.फत्तेपूर, ता.जामनेर) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

फत्तेपूरतच्या दुचाकी चोरट्यास अटक
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२१: कुसुंबा जकात नाक्याजवळ वॉशिंग सेंटरवरुन दुचाकी चोरणाºया दीपक रामचंद्र वनारे (वय ३० रा.फत्तेपूर, ता.जामनेर) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान, वनोरे याला गुरुवारी न्या.बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर सायंकाळीच चोरटा निष्पन्न झाला. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी संशयित वनोरेच्या शोधार्थ पथक रवाना केले. रात्री त्याला ताब्यात घेऊन गुरुवारी अटक करण्यात आली. तपासाधिकारी भालचंद्र पाटील यांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.