शिलाई मशीनची चोरी बच्चू गँगला अटक
By Admin | Updated: May 16, 2014 14:47 IST2014-05-16T14:47:34+5:302014-05-16T14:47:34+5:30
चोरी प्रकरणात बच्चू कंपनी या नावाने ओळखल्या जाणार्या १० ते १६ वर्ष वयोगटातील चार अल्पवयीन मुलांना शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी गेंदालाल मील परिसरातून अटक केली

शिलाई मशीनची चोरी बच्चू गँगला अटक
जळगाव : शहरातील दाळफड भागातील नारायण पॉलीमीलर या कापडाच्या पिशव्या शिवण्याच्या दुकानातून ११ शिलाई मशीन व मोटार चोरी प्रकरणात बच्चू कंपनी या नावाने ओळखल्या जाणार्या १० ते १६ वर्ष वयोगटातील चार अल्पवयीन मुलांना शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी गेंदालाल मील परिसरातून अटक केली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली़ नारायण रामनिवास तिवारी यांच्या दाळफड येथील नारायण पॉलीमर या दुकानातून मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास २२ हजार २४० रुपये किंमतीच्या २ चालू व ९ जुन्या शिलाई मशीन व मोटार चोरीला गेली होती़ या प्रकरणी बुधवारी नारायण तिवारी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ शनिपेठ पोलिसांना एका भंगारवाल्याकडून आरोपींविषयी माहिती मिळाली होती़ तसेच दुसर्या एका गुन्ह्यात आरोपीचे फुटेजच्या आधारे पोलिसांनी चारही अल्पवयीन आरोपींना गेंदालाल मील परिसरातून अटक केली़ ही कारवाई शनिपेठचे डी़बी़चे कर्मचारी पोलीस नाईक विजयसिंग पाटील, जितेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, दुष्यंत खैरनार, नरेंद्र ठाकरे यांनी केली़ अल्पवयीन असूनही कमालीचे धाडस घरात असलेले दारिद्र्य, त्यात शिक्षणाचा अभाव, कुटुंब आणि समाजाकडून होत असलेल्या प्रतारणेमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळतात़ त्यापैकीच ही बच्चू गँग आहे़ या चार जणांनी नारायण पॉलीमीलर या दुकानातून तब्बल ११ सिलाई मशीन चोरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे़