मेहुणबारेत सात जनावरांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:35+5:302021-09-08T04:22:35+5:30

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील दीपक गढरी व संदीप चौधरी यांचे मेहुणबारे तिरपोळे दरम्यान, रस्त्यालगत शेत असून शेतात शेडमध्ये गुरे ...

Theft of seven animals in Mehunbare | मेहुणबारेत सात जनावरांची चोरी

मेहुणबारेत सात जनावरांची चोरी

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील दीपक गढरी व संदीप चौधरी यांचे मेहुणबारे तिरपोळे दरम्यान, रस्त्यालगत शेत असून शेतात शेडमध्ये गुरे बांधलेली असतात. सोमवारी सायंकाळी गुरांना चारापाणी करून दीपक गढरी हे घरी गेले. आज पहाटे नेहमीप्रमाणे शेतात आले असता दावणीला बांधलेल्या चार वासरे दावणवरून दिसून न आल्याने गढरी यांनी या वासरांचा आसपास शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाही. अज्ञात भामट्यानी ही वासरे चोरल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गढरी यांच्या शेतापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या संदीप चौधरी यांच्या शेतातूनदेखील तीन गायी चोरीस गेल्या आहे. एकाच रात्रीतून तब्बल ४ वासरी व ३ गायी चोरीस गेल्याच्या घटनेने परिसरात शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मेहुणबारे पोलिसांना कळताच घटनेचा पंचनामा केला.

Web Title: Theft of seven animals in Mehunbare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.