पहूर येथे सलग दुसऱ्या दिवशीही चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:18 IST2021-09-19T04:18:45+5:302021-09-19T04:18:45+5:30

संतोषीमाता नगरातील रहिवासी साई ट्रेडिंगचे मालक विजय सुधाकर चौधरी परिवारासह दोन दिवसांपासून बाहेरगावी गेले आहेत. बंद घराचा फायदा घेऊन ...

Theft for the second day in a row at Pahur | पहूर येथे सलग दुसऱ्या दिवशीही चोरी

पहूर येथे सलग दुसऱ्या दिवशीही चोरी

संतोषीमाता नगरातील रहिवासी साई ट्रेडिंगचे मालक विजय सुधाकर चौधरी परिवारासह दोन दिवसांपासून बाहेरगावी गेले आहेत. बंद घराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री कटरच्या साह्याने कडीकोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाट फोडले. त्यातील साहित्य,कपडे अस्ताव्यस्त केले व आठ हजारांची रोकड,सात ते आठ भार चांदीचे शिक्के,चार ग्रॅम वजनाचा सोन्याचा दागिना असा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. विजय चौधरी यांचा भाऊ विशाल घराकडे आला असता घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक एस.पी. बनसोड, पोलीस ईश्वर देशमुख, श्रीराम ढाकरे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.पहूर, ता.जामनेर: पहूर येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी संतोषी मातानगरातील बंद घराचा कडीकोयंडा तोडून २५ ते ३० हजारांचा ऐवज चोरुन नेला. सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक धास्तावले आहेत.

संतोषीमाता नगरातील रहिवासी साई ट्रेडिंगचे मालक विजय सुधाकर चौधरी परिवारासह दोन दिवसांपासून बाहेरगावी गेले आहेत. बंद घराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री कटरच्या साह्याने कडीकोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाट फोडले. त्यातील साहित्य,कपडे अस्ताव्यस्त केले व आठ हजारांची रोकड,सात ते आठ भार चांदीचे शिक्के,चार ग्रॅम वजनाचा सोन्याचा दागिना असा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. विजय चौधरी यांचा भाऊ विशाल घराकडे आला असता घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक एस.पी. बनसोड, पोलीस ईश्वर देशमुख, श्रीराम ढाकरे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.

Web Title: Theft for the second day in a row at Pahur