लाखो रुपयांची सौंदर्य प्रसाधने चोरीस

By Admin | Updated: January 5, 2017 12:08 IST2017-01-05T12:08:06+5:302017-01-05T12:08:06+5:30

अत्यंत वर्दळीच्या चुडी मार्केटमध्ये चोरट्यांनी सौंदर्य प्रसाधनांचे दुकान फोडत २० हजारांच्या रोकडसह लाखो रुपयांची सौंदर्य प्रसाधने लांबवली.

Theft of millions of rupees worth of beauty | लाखो रुपयांची सौंदर्य प्रसाधने चोरीस

लाखो रुपयांची सौंदर्य प्रसाधने चोरीस

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
भुसावळ, दि. 5 -  शहरातील अत्यंत वर्दळीच्या चुडी मार्केटमध्ये चोरट्यांनी सौंदर्य प्रसाधनांचे दुकान फोडत २० हजारांच्या रोकडसह लाखो रुपयांची सौंदर्य प्रसाधने लांबवली. शहरात गेल्या काही दिवसांपासून चो-या वाढल्या असून पोलिसांचा धाक संपल्यात जमा आहे.
 
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शहिद अब्दुल हमीद चुडी मार्केटमधील सय्यद सादीक सैय्यद हारुण यांच्या मालकीचे पाकिजा दुल्हन बँगल्स जनरल स्टोअर्स चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. दुकानाचे चॅनल गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत २० हजारांची रोकड, चायना मोबाईल, ब्लू टुथ स्पीकर, ज्वेलरी डायमंड सेट तसेच महागडा दुल्हन साज, डायमंड बांगड्या तसेच महागडी सौंदर्य प्रसाधने मिळून सुमारे दोन लाखांच्या वस्तू लांबवल्या. 
 
गुरुवारी सकाळी स्वच्छता कर्मचारी चुडी मार्केटची स्वच्छता करीत असताना त्यास चोरी झाल्याचे लक्षात आल्याने दुकान मालकास कळवण्यात आले़ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली मात्र दुपारपर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Theft of millions of rupees worth of beauty