गोठ्यात बांधलेल्या पशुधनाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:52+5:302021-07-22T04:11:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोदवड : शहरातील जुना भाजीबाजार परिसरात नाल्याकाठी असलेल्या गोठ्यातून बसलेली जनावरे चोरीला गेल्याची घटना ...

Theft of livestock tied up in a barn | गोठ्यात बांधलेल्या पशुधनाची चोरी

गोठ्यात बांधलेल्या पशुधनाची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

बोदवड : शहरातील जुना भाजीबाजार परिसरात नाल्याकाठी असलेल्या गोठ्यातून बसलेली जनावरे चोरीला गेल्याची घटना घडली. यातील बरेचसे पशुधन हे दुभते होते. ही घटना २० रोजी सकाळी उघडकीस आली.

शहरातील प्रभाग क्रमांक सहामधील रहिवासी दीपाली संजय पांडे यांच्या अंगणात बांधलेल्या दोन गाई तसेच एक वासरू, त्याचप्रमाणे कचरूलाल जैस्वाल यांची एक गाय, गोपाल व्यास यांच्या दोन गाई व दोन वासरू, सुरेश बडगुजर यांच्या दोन गाई व एक वासरू, तर संजय शर्मा यांचे दोन गोऱ्हे असे एकूण १३ पशुधन चोरीला गेले आहे.

त्यापैकी गोपाल व्यास व दीपाली पांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातून एका चारचाकी वाहनात रात्री या पशुधनास कोंबून नेणारी टोळी सक्रिय असून, त्याचा शोध घेणे गरजेचे आहे.

सध्या खरीप हंगामात पशुधनाची आवश्यकता असताना, नेमके याच काळात पशुधन चोरीस जात असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

Web Title: Theft of livestock tied up in a barn