मारहाण करुन सोन्याचे दागिने लुटल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 21:30 IST2017-09-17T16:59:50+5:302017-09-17T21:30:04+5:30

व्यवसायाच्या भागीदारीतून वाद होऊन इम्तीयाज बशीर खान (रा.फातिया नगर, जळगाव) यांनी मारहाण करुन दोन तोळ्याची सोनसाखळी हिसकावून घेतल्याची तक्रार मोहम्मद युनुसदी चौधरी (वय ३९ रा.तांबापुरा, जळगाव) यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने गुन्हा दाखल करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

Theft of gold ornaments by beatings | मारहाण करुन सोन्याचे दागिने लुटल्याची तक्रार

मारहाण करुन सोन्याचे दागिने लुटल्याची तक्रार

ठळक मुद्देन्यायालयाने दिले चौकशीचे आदेश एमआयडीसीतील घटना दोन तोळ्याची सोनसाखळी लुटल्याची तक्रार

आॅनलाईन लोकमत


जळगाव दि,१७ व्यवसायाच्या भागीदारीतून वाद होऊन इम्तीयाज बशीर खान (रा.फातिया नगर, जळगाव) यांनी मारहाण करुन दोन तोळ्याची सोनसाखळी हिसकावून घेतल्याची तक्रार मोहम्मद युनुसदी चौधरी (वय ३९ रा.तांबापुरा, जळगाव) यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने गुन्हा दाखल करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद चौधरी व इम्तियाज बशीर यांचा एमआयडीसीतील ई-सेक्टरमध्ये के.सी.प्लास्टीक नावाने भागीदारीत उद्योग आहे. २०१६ या वर्षात चौधरी यांनी खान यांना उद्योगाच्या ठिकाणी येण्यास बंदी घातली. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर खान यांनी ३१ जानेवारी २०१७ रोजी चौधरी यांना उद्योगाच्या ठिकाणी बोलावून घेत मारहाण केली व त्यात दोन तोळ्याची सोनसाखळी लुटल्याची तक्रार चौधरी यांनी केली. पोलिसात गुन्हा दाखल न झाल्याने चौधरी यांनी न्यायालयात धाव घेतली. त्याची दखल घेत न्यायालयाने गुन्हा दाखल करुन चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.त्यावरुन रविवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक रोहन खंडागळे करीत आहेत.

Web Title: Theft of gold ornaments by beatings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.