बंद घरातून साडेआठ लाखांच्या वस्तुंची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 19:13 IST2019-05-11T19:13:00+5:302019-05-11T19:13:35+5:30

चाळीसगाव : मनिषा महाजन यांची तक्रार

Theft of close to eight lakh items from a closed house | बंद घरातून साडेआठ लाखांच्या वस्तुंची चोरी

बंद घरातून साडेआठ लाखांच्या वस्तुंची चोरी

चाळीसगाव : ताबेगहाण बंद घरातून घर मालक मुकूंद कोठावदे यांच्यासह कुटुंबियातील सदस्यांनी ८ लाख ७९ हजार २५० रुपये किंमतीच्या संसार पयोगी सामानासह फर्निचर, सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार मनिषा सोनू महाजन यांनी पोलीसात केली.
माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर २ जून २०१६ रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यावेळी त्यांनी आपल्या ताबेगहाण असलेल्या घराला कुलूप लावले होते.
हल्ला झाल्यामुळे घरबंद स्थितीत होते. दहशतीमुळे त्यांनी सदरील घर उघडले नाही. ८ रोजी तपासअधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासमवेत स्पॉट पंचनामासाठी गेलो असता ही बाब उघडकीस आली.
घटनास्थळी मुकूंद कोठावदे यांनी पोलिसांसमोर त्यांच्याजवळ असलेल्या चावीने घर उघडले. घरात प्रवेश केला असता त्यात आमची एकही वस्तू घरात दिसून आली नाही. या सर्व वस्तू २ जून २०१६ ते ८ मे २०१९ च्या दरम्यान घर मालक मुकूंद कोठावदे, भावेश कोठावदे व इतर सदस्यांनी माझ्या घराचे कुलूप तोडून अनाधिकृत प्रवेश करुन नमूद केलेले साहित्य चोरुन नेले आहे. असे तक्रारीत महाजन यांनी म्हटले आहे. संबंधितांविरुध्द भादंवि.कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. घरातील फर्निचर, संसार उपयोगी वस्तु व सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्या त्यांनी सोबत जोडल्या आहेत.
तक्रारीच्या प्रती पोलीस अधीक्षक जळगाव,अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव व पोलीस उपअधीक्षक चाळीसगाव यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

Web Title: Theft of close to eight lakh items from a closed house