शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

लिंबू उत्पादकांनाही ढगाळ वातावरणाने पिळले; दर घसरले, अद्रक अन् वांगी महागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 14:01 IST

मार्चनंतर महागाईने तापणारा भाजीबाजारावर यंदा मात्र स्वस्ताईची सावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.

- कुंदन पाटील

जळगाव : ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसासह ढगाळ वातावरण असल्याने लिंबूची मागणी ओसरली आहे. आवक वाढली असताना मागणी घटल्याने दीडशे रुपयांवर गेलेले लिंबू आता शंभर रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहेत. या महिन्यात लग्नसराई नसली तरी साखरपुड्यासह जाऊळ, ठिकठिकाणच्या यात्रोत्सवानिमित्त भंडाऱ्याचे कार्यक्रम होत असल्याने वांगीही तेजीत आली आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजेरी कायम ठेवली आहे. एरव्ही मार्चनंतर महागाईने तापणारा भाजीबाजारावर यंदा मात्र स्वस्ताईची सावली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.

वाग्यांना मागणी वाढली

सध्या जावळासह, साखरपुडा, यात्रोत्सवानिमित्त भंडारा, तसेच विविध सणावळीनिमित्त सार्वजनिक भोजनांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमांमध्ये वांग्याच्या भाजीला पसंती कायम असल्याने मागणी वाढली आहे. आपोआपच छोट्या वाग्यांच्या दरात प्रतिकिलोप्रमाणे दहा ते पंधरा रुपयांची तेजी आली आहे.

आद्रकही महागले

मार्चअखेरीस आद्रकचा हंगाम सरत येतो. त्यामुळे नव्या आद्रकाची आवक सध्या सुरु झालेली नाही. त्यामुळे आद्रकही १२० रुपये किलोंवर भिडले आहे.

लिंबूने उत्पादकांनाच पिळले

गेल्या महिन्यात दीडशे रुपये प्रतिकिलोवर लिंबूचे दर होते. तशातच नवा बहर आल्याने  आणि ढगाळ वातावरणासह वादळ व अवकाळीचा फटका बसताच लिंबूची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली.  मात्र ञस्वयंपाक घरासह व्यावसायिकांकडून लिंबूंची मागणी ओसरली.त्यामुळे लिंबू सध्या शंभर रुपयांवर आला आहे. गेल्या एप्रिल महिन्यात  लिंबू  दोनशे रुपयांवर पोहोचला होता. 

भाजपाल्यांचे प्रतिकिलो दरभाजी-                       दरछोटी वांगी-            ५० ते ६०मोठी वांगी-             ४०-५०जाड मिरची-           ४०-५०बारिक मिरची-       ५०-६०भोपळा-                ३०-३५गवार-                   ८०-१००भेंडी-                    ८०-९०पालक (जुडी)-        १५-२०मेथी                      ६०-७०फ्लॉवर-                ४०-५०आद्रक-                 १००-१२०गिलके-                 ६०-७०दोडके-                ६०-७०

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव