शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाची दादागिरी; कीर्तनकारासह वारकऱ्यांना मारहाण करण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 16:41 IST

चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग नगरात दरवर्षी प्रमाणे यंदाही सप्तशृंगी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सातव्या दिवशी सोमनाथ महाराज जपे यांची कीर्तनसेवा होती.

प्रशांत भदाणे -जळगाव - एका कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाने दबंगगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात घडला आहे. पोलीस निरीक्षकाने वारकऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही, तर वारकरी संप्रदायात कीर्तनकार ज्या जागेवर उभे राहून विवेचन करतात, त्याला नारदाची गादी म्हटले जाते, पोलीस निरीक्षक महोदयांनी या मानाच्या गादीचाही अपमान केला आहे. पायात बूट घालून ते गादीवर उभे राहिले. त्यांनी कीर्तनकारासह वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकीही दिली. यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग नगरात दरवर्षी प्रमाणे यंदाही सप्तशृंगी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सातव्या दिवशी सोमनाथ महाराज जपे यांची कीर्तनसेवा होती. कीर्तन सुरू असताना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील हे त्याठिकाणी आले. त्यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून नियमावलीचे कारण देत वारकऱ्यांशी अरेरावी केली. ते एव्हढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकीही दिली, असा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकरणात पोलीस निरीक्षकांची बाजू मात्र, समोर आलेली नाही.

या घटनेचा वारकरी संप्रदायाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये एका व्यक्तीने पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी छोटा स्पीकर लावला, म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आता चाळीसगावात पोलीस निरीक्षकाने वारकऱ्यांना दमदाटी केली. या दोन्ही घटनांमधून पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे, हे मात्र नक्की. दरम्यान, या प्रकरणात आता पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिसChalisgaonचाळीसगाव