शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
'याला तर तडीपार करायला हवं…'; निवडणूक निकालापूर्वीच माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
3
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
4
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
5
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
6
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
7
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
8
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
9
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
10
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
11
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
13
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
14
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
15
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
16
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
17
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
18
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
19
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
20
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल

माध्यान्ह भोजनचे २८ कोटींचे बिल आले साडेसहा कोटींवर

By विलास बारी | Published: January 05, 2024 11:49 PM

लोकमतच्या वृत्त मालिकेनंतर शासनाचे वाचले २१ कोटी ६९ लाख रुपये : संपूर्ण राज्यात लेखा परीक्षणाची गरज

जळगाव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व राज्य शासनाकडून नोंदीत बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या माध्यान्ह व रात्रकालीन भोजन योजनेचे लाभार्थी जिल्ह्यात ‘दिन दुगना रात चाैगुना’ झाल्याबाबतची वृत्तमालिका प्रसिद्ध करीत यातील अनागोंदी ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर जून महिन्यातील २८ कोटींवरील बिल सहा कोटी ५५ लाख ८९ हजार ३१ रुपयांवर आले आहे. ‘लोकमत’मुळे शासनाचे तब्बल २१ कोटी ६९ हजार रुपयांची रक्कम वाचली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या या याेजनेच्या अनागोंदी संदर्भात चौकशी समिती नियुक्त करून लेखापरीक्षण करण्याची गरज आहे.

राज्यातील बांधकाम कामगारांना माध्यान्ह व रात्रकालीन जेवणासाठी राज्य शासनाने ३० ऑगस्ट २०२१ पासून मुंबईसह राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये योजना सुरू केली. जळगाव, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, अहमदनगर याठिकाणी भोजन पुरविण्यासाठी मे. इंडो अलाईड प्रोटीन फुडस् प्रा. लि. या कंपनीसोबत शासनाने करार केला आहे. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान झालेले दुर्लक्ष, करारनाम्यातील अटी व शर्तींच्या उल्लंघनाकडे केलेला कानाडोळा, बांधकाम मजुरांऐवजी दुसऱ्याच याद्यांना देण्यात आलेली मंजुरी या सर्व बाबी लोकमतने वृत्त मालिकेच्या माध्यमातून उघड केल्या आहेत.

ऑक्टोबर महिन्याचे बिल आले ६ कोटी ५५ लाखांवर

लोकमतची वृत्तमालिका प्रसिद्ध झाल्यानंतर सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने फक्त नोंदीत कामगारांना लाभ देण्यावर भर दिला. त्यामुळे खरे लाभार्थी यांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जून २०२३ या महिन्यात असलेले २८ कोटींवरील बिल हे ऑक्टोबर २०२३ या महिन्यात सहा कोटी ५५ लाख ८९ हजार ३१ रुपयांवर आले आहे. ‘लोकमत’ने या योजनेतील अनागोंदी समोर आणल्यानंतर शासनाचे एकट्या जळगाव जिल्ह्यात महिन्याला तब्बल २१ कोटी ६९ लाख रुपये वाचले आहे.अनागोंदीला चाप, नंतर योजनाच केली बंद

या योजनेतील अनागोंदीला चाप बसल्याने ठेकेदार कंपनीच्या महिन्याच्या बिलात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यानंतर शासनाने या योजनेसाठी निधीचे कारण पुढे करीत नोव्हेंबर महिन्यापासून योजनाच बंद केली. सुरुवातीच्या काळात मंजूर निधीची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी थांबविली असती तर, योजना बंद करण्याची शासनावर वेळ आली नसती.

चाैकशी समितीसह लेखा परीक्षणाची गरजया योजनेतील मोठ्या प्रमाणात असलेली अनागोंदी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातील या योजनेच्या चाैकशीसाठी समिती नियुक्त करून लेखा परीक्षण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :JalgaonजळगावSchoolशाळा