शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेसिंगच्या नादात चारचाकीने उडवले, एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडिलांना धक्का

By सुनील पाटील | Updated: August 28, 2022 20:30 IST

मेहरुण तलावकाठची घटना : एकुलता मुलगा गेल्याने आई, वडिलांना धक्का

जळगाव : दोन चारचाकींमध्ये लागलेल्या शर्यतीत एका कारने विक्रांत संतोष मिश्रा (वय ११, रा.एकनाथ नगर) या सायकलस्वार बालकाला उडविले घटना रविवारी सायंकाळी चार वाजता मेहरुण तलावाकाठी घडली. हा अपघात इतका भयंकर होता की चारचाकीच्या धडकेत विक्रांत चेंडूसारखा १५ फूट वर फेकला गेला. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चारचाकी चालविणारा देखील १६ वर्षाचाच मुलगा आहे.

या घटनेच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टी असल्याने विक्रांत मिश्रा हा चुलत भाऊ सुनील जितेंद्र मिश्रा याच्यासोबत सायकलीने मेहरुण तलावाकडे फिरायला गेला होता. तेथे मास्टर कॉलनीतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा कार घेऊन शिकण्यासाठी मेहरुण तलावाकाठी गेला होता. मित्राचीही कार या ठिकाणी होती. दोन्ही मुलांनी कारची शर्यत लावली. त्यात (क्र.एम.एच १९ बी.यू ६००६) रस्त्याच्याकडेला असलेल्या विक्रांतला जोरदार धडक दिली. त्यात विक्रांत चेंडूसारखा १५ फुट उंच व पुढे फेकला गेला. सायकल बाजुला फेकली गेली. डोक्याला मार लागल्यामुळे विक्रांतचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे घाबरलेल्या चुलत भाऊ सुनीलने घरी फोन करुन माहिती दिली. आई, वडिलांनी मुलाचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला.घटना घडल्यानंतर जवळल्या नागरीकांनी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

चौथीच्या वर्गात शिक्षण

विक्रांत हा मेहरुण जलतरण तलावसमोरील विद्या इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता.वडील संतोष गिरीजाशंकर मिश्रा हे जळगाव साऊंड असोसिएशन संघटनेचे सहसचिव म्हणून काम करतात. आई रिचा गृहिणी आहे. एकुलता मुलगा गेल्याने दोघांना मोठा धक्का बसला.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातPoliceपोलिसcarकार