शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

रशियात बुडालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह गुरुवारी मुंबईत येणार

By सुनील पाटील | Updated: June 12, 2024 21:37 IST

जळगाव : रशिया येथे नदीपात्रात बुडून मयत विद्यार्थ्यांचे मृतदेह शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर गुरुवार दि. १३ जून रोजी मुंबई ...

जळगाव: रशिया येथे नदीपात्रात बुडून मयत विद्यार्थ्यांचे मृतदेह शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर गुरुवार दि. १३ जून रोजी मुंबई विमानतळावर पोहोचणार आहेत ‌ हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाचोरा व अमळनेर प्रांताधिकार्‍यांना प्राधिकृत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

रशिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या जिया फिरोज पिंजारी (वय २०), जिशान अशफाक पिंजारी (वय २०) दोन्ही रा. अमळनेर तसेच हर्षल अनंतराव देसले (वय १९) रा. भडगाव या तिनही विद्यार्थ्यांचा ४ जून रोजी रशियातील वोल्खोव्ह नदीत बुडुन मृत्यू झाला होता. त्या अनुषंगाने भारतीय वाणिज्य दुतावास देवीचरण धुलीदास यांनी पाठविलेल्या पत्रानुसार तिनही मयत विद्यार्थ्यांचे शव १३ जून रोजी दुपारी एक वाजता विमानाने दुबई येथून रवाना होतील व मुंबई विमानतळावर सायंकाळी ५.४५ वाजता पोहचणार आहेत.

या विद्यार्थ्यांचे शव मुंबई विमानतळावरुन शासकीय प्रचलीत प्रक्रीयेनुसार ताब्यात घेऊन नातेवाईकांकडे सोपविण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर व पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांना प्राधिकृत केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावrussiaरशिया