शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

जळगाव एमआयडीसीत थाटले अवैध दारुचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 5:47 PM

एमआयडीसीत अनेक कंपन्याच्या बाहेर मुख्य रस्त्याला लागून अवैध प्रकारे देशी, विदेशी व गावठी दारु सर्रासपणे विक्री केली जात आहे. या व्यावसायिकांनी हिरवी नेटची जाळी लावून ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करुन दिली आहे. या अवैध दारु विक्रीमुळे हाणामा-या, चो-या, लूटमार यासारख्या घटनांना खतपाणी मिळत आहे, त्यामुळे उद्योजक कमालीचे त्रस्त झाले आहेत. 

ठळक मुद्देउद्योजक झाले त्रस्त चो-या व लुटमारीच्या घटना वाढल्यापोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५ :  एमआयडीसीत अनेक कंपन्याच्या बाहेर मुख्य रस्त्याला लागून अवैध प्रकारे देशी, विदेशी व गावठी दारु सर्रासपणे विक्री केली जात आहे. या व्यावसायिकांनी हिरवी नेटची जाळी लावून ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करुन दिली आहे. पोलिसांनी जणू आपल्याला अधिकृत परवानाच दिला आहे, या अविर्भात या व्यायसायिकांचे वागणे आहे. एकंदरीत या अवैध दारु विक्रीमुळे हाणामा-या, चो-या, लूटमार यासारख्या घटनांना खतपाणी मिळत आहे, त्यामुळे उद्योजक कमालीचे त्रस्त झाले आहेत.  एमआयडीसीतील अवैध धंद्याबाबत ‘लोकमत’ ने वेळोवेळी आवाज उठविला आहे. मंगळवारी दुपारी व सायंकाळी ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली असता अनेक ठिकाणी खुलेआमपणे दारु विक्री केली जात असल्याचे दिसून आले. या विक्रेत्यांना कोणाचाच धाक नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. खेडी परिसरात तर महामार्गाला लागूनच हिरवी जाळी लावून अवैध दारु विक्री केली जात होती. तेथून थोड्याच अंतरावर पेट्रोल पंपाच्या समोर एका लॉजच्या बाजुलाच काही ग्राहक दारु प्यायला बसले होते.  सायंकाळी ७ ते रात्री २ पर्यंत भरते जत्रा  एमआयडीसीच्या एम व एन या दोन सेक्टरमध्ये सायंकाळी ७ ते रात्री २ वाजेपर्यंत मद्यपींची अक्षरश: जत्रा भरलेली असते. एक विक्रेता सायंकाळी सात वाजता देशी व गावठी दारु घेऊन येतो. विक्रीच्या ठिकाणी पाणी पाऊच व चखन्याची व्यवस्था केली जाते. एका ठिकाणी बियरशॉपच्या नावाखाली सर्वच प्रकारची दारु तेथे विकली जात होती. म्हाडा कॉलनीला लागून नाल्याकाठी देखील बिनधास्तपणे गावठी दारु विक्री केली जात होती.  राजकीय आश्रयाच्या गुन्हेगारांना हप्ता  भारत पेट्रोलियम, साई नगर, सरकारी गोदाम या भागात हिरव्या नेट लावून आतमध्ये दारु विक्री केली जात होती. तर एका ठिकाणी ढाब्यावर तर प्रत्येक प्रकारची दारु व बियर मिळत होती. हा ढाबा चालक राजकीय आश्रय असलेल्या गुन्हेगारांना दर महिन्याला हप्ता देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांपेक्षा तीन पट हप्ता या गुन्हेगारांना मिळतो. सहा महिन्यापूर्वी एका परिविक्षाधीन पोलीस अधिकाºयाने या ढाब्यावर धाड टाकली होती.